नवी दिल्लीत श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निघृणपणे हत्या करीत तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतही असाच प्रकार समोर आला होता. मनोज साने या व्यक्तीने लिव्ह इन पार्टनर महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे अक्षरश: कुकरमध्ये शिजवल्याचा किळसवाणा प्रकार घडला होता. त्यानंतर आता मेरठमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. यानंतर तिने पतीच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले.