महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधन येथे भरते. बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या यात्रेमुळे ग्रामीण भागातील लोकांना धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्याची संधी मिळते.