नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळे शेती पिकं धोक्यात आली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. दरम्यान एकीकडेही परिस्थिती असतानाच दुसरीकडे नाशिकच्या दुगाव फाटा या परिसरामध्ये राहणाऱ्या सुरज थेटे या तरुण शेतकऱ्याचे तीन एकर वरील टोमॅटो पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या टोमॅटो पिकाला पावसाचा कोणताही फटका बसलेला नाही. पण याला कारण ठरलंय ते म्हणजे थेटे यांनी लढवलेली अनोखी शक्कल. नक्की या तरुण शेतकऱ्याने काय शक्कल लढवली आहे आपण पाहूया.