एकीकडे पालकमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना दुसरीकडे मात्र महायुतीत सगळं आलबेल असल्याचं चित्र पहायला मिळतंय.दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे कोस्टल रोडच्या कार्यक्रमात एकत्र आले. यानंतर दोघांनीही एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी गाडीत बसून त्यांची बराच वेळ चर्चा झाली..