Dhule| पिण्याच्या पाण्यापेक्षाही गहू स्वस्त; गव्हाला भाव कवडीमोल, दर घसरल्याने शेतकरी संकटात

धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक उत्तम आले असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च या तारखेला पावसाचा अंदाज वर्तवल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. उर्वरित 10 ते 20 टक्के गव्हाची काढणी अद्याप बाकी आहे. निसर्गाची साथ मिळाल्याने यावर्षी गव्हाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे, मात्र आता बाजारातील घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे...

संबंधित व्हिडीओ