इराण इस्राइल अमेरिका युद्धाची झळ आता पुण्यातील पर्यटन व्यवसायाला बसू लागली आहे....शहरातील बहुतांश ट्रॅव्हल एजन्सीकडे आखाती देशातील बुकिंग पूर्णतः कॅन्सल झाले आहे....आखाती देशांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपयांची तिकिटे खरेदी करावी लागत आहे....दरवर्षी आखाती देशांमध्ये दुबई, अबुधाबी संयुक्त अरब अमिराती येथे जाणारे पर्यटक आता पूर्णतः थांबले आहे....याचा लाखो रुपयांचा आर्थिक फटका ट्रॅव्हल एजन्सीजला बसला आहे....यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी