Nashik अत्याचार प्रकरण| राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध असलेला आरोपी अशोक खरात अटकेत

नाशिक अत्याचार प्रकरणी, पोलीस तपासात मोठी अपडेट समोर आलीय.. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे... संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे...तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे... या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू आहे... त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करीत आहे.

संबंधित व्हिडीओ