Washim Drought| दुष्काळात ठिबक सिंचनाचा आधार, वाशिममध्ये मागणीत 40 टक्क्यांनी वाढ

वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकरी आता ठिबक सिंचनाला पसंती देत आहेत. तूर, हळद आणि कपाशीसारखी पिकं जगवण्यासाठी ठिबक संचांच्या खरेदीत वाढ झालीये..मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ठिबक सिंचनाच्या मागणीत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. कृषी साहित्य विक्रेत्यांनीही यंदा ठिबक सिंचन संचांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं आहे. कमी पाण्यात अधिक क्षेत्राला पाणी देता येत असल्याने ठिबक सिंचनाचा फायदा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पारंपरिक पद्धतीने पाणी देताना होणारा अपव्यय टाळून पिकांच्या मुळाशी थेट पाणी पोहोचवण्यास ठिबक सिंचन मदत करतं. त्यामुळे एकीकडे पाणीटंचाईचं संकट आणि दुसरीकडे पिकं वाचवण्याचं आव्हान असताना, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीबचत करत उत्पादन टिकवण्याचा प्रयत्न वाशिम जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. Drought in Washim: Drip irrigation proves to be a lifeline; demand surges by 40 percent.

संबंधित व्हिडीओ