Pandharpurच्या वारीत अर्बन नक्षलवादी,मनिषा कायदेंच्या आरोपांवर Eknath Shinde यांनी दिलं स्पष्ट उत्तर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे.चौथ्या दिवशी वारीमध्ये अर्बन नक्षलवादाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.कालच विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी वारीत अर्बन नक्षल वादाचा मुद्दा उपस्थित केला होता. वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत असून तिथे जाऊन भाषणं देतायत असा आरोप मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केलाय. तर शासन याबाबत गंभीर असून योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यंमंत्री शिंदे म्हणालेत. आज या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.मनीषा कायंदे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध विरोधकांकडून केला जाणार आहे. त्याचसोबत काही महत्वाचे मुद्दे आज सभागृहात उपस्थित केले जाणार आहेत.मंगेशकर रुग्णालयात जो काही प्रकार घडला त्यानंतर धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आलेल्या जागांविषयी लक्षवेधी आज मांडली जाणार आहे. तर मुंबई शहर विकास आणि नागरिकांचं पुनर्वसन हे देखील विषय आज महत्वाचे ठरू शकतात.

संबंधित व्हिडीओ