कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देताच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कर्जफेड करण्यास सुरुवात केल्याचे बघायला मिळते आहे.बँकेने वेळोवेळी सूचना करून देखील कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नव्हती मात्र यामुळे दुसरीकडे व्याजाची रक्कम देखील दिवसेंदिवस वाढत गेली. विशेष म्हणजे बँकेने आता आक्रमक पवित्र घेतला असून शेतकऱ्यांना थेट मालमत्ता जप्तीची नोटीसच निबंधक कार्यालयांमार्फत पाठवली जाते आहे यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळत आहे.