ऊसाला प्रतिटन 5 हजारांचा भाव द्या, सोलापुरात ठाकरे गटाचं 'गांधीगिरी' आंदोलन | Solapur | Protest

साखरेचे भाव गगनाला भिडले असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रतिटन 5 हजार रुपये भाव मिळावा,या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी थेट शेतशिवारात जाऊन ऊस तोडणी रोखली. ऊस तोडणी कामगारांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं.दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना कारखानदारांनी ऊसाला प्रतिटन 5 हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ