बच्चू कडू यांच्या आंदोलनापूर्वी गोंधळ. चंद्रपुरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव.आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या वाहनांना अडवले जात असून, त्यांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाण ते घुग्घुस शहरातील कारगिल चौकापर्यंत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.