अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच गाजतेय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेवर एसआयटी चौकशी लावून मान्यता रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केलाय. एसआयटी चौकशी लावून बघा, तुमचे डोळे काढून गोट्या खेळू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी वडेट्टीवारांवर खोचक टीका केलीय. बावनकुळे असल्या धमक्यांना घाबरत नाहीत. काँग्रेसच्या गोट्या राज्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत आधीळ खेळल्या, अशा शब्दात बन यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलंय.