मॉक ड्रिल च्या पार्श्वभूमीवरती मुंबईत सुद्धा जोरदार तयारी सुरु झाली असून नागरिक सुरक्षा संचालक प्रभात कुमार यांच्या दालनामध्ये एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. मुंबईत देखील प्रत्येक विभागांमध्ये दुपार नंतर मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरी सुरक्षा स्वयंसेवकांनी लोकांची सहायता कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक सादर केलं जाणार आहे. याविषयी नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक प्रभात कुमार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.