अंधश्रद्धेतून भोकरदन तालुक्यात नरबळी आणि आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भोकरदन तालुक्यातील वाळसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीय. या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हंटल होत.या फिर्यादी वरून भोकरदन पोलिसांनी भोंदू बाबाला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचं म्हटलंय. आरोपी भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्त धनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती त्यासाठी त्यानं ईश्वरी हिची मागणी केली होती. पती पत्नीनी नकार दिल्याने या बाबाने एका वकीला मार्फत पती पत्नीला सहा लाखाची नोटीस ही बजावली होती. त्याच त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केलीय.