चिनाब नदीवरील सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत.यामुळे पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यातील सलाल धरणातून सकाळी सव्वा सहा वाजता पाणी सोडण्यात आले.दोन दिवसांपूर्वीही बगलिहार धरणाचे दोन आणि सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते, ज्यामुळे पाकिस्तानसाठी पाण्याची पातळी वाढली.रियासीतील तलवारा, कानसीपट्टा, जेडी, डेरा बाबा आणि अखनूरच्या ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.