शरद पवार गटातील सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड टाकली आहे. सकाळपासूनच आयकर अधिकाऱ्यांनी त्यांच्या फलटण इथल्या घराची तपासणी सुरू केली आहे. या सर्व प्रकारामुळे सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे.