अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत इराणमध्ये किमान 1350 लोक मारले गेले आहेत आणि 17,000 हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यात 1100 मुले आहेत. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवर आपले हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 687 लोकांचा मृत्यू झाला आहे.UNHCR नुसार, इराणमध्ये सव्वा तीन लाख लोक विस्थापित होतील. अमेरिकेने पहिल्यांदाच इराणविरुद्ध 15 टन वजनाचे बॉम्ब देखील वापरले आहेत. दरम्यान, इराणी क्षेपणास्त्रांनी तेल अवीव, हैफा, बेत शेमेश आणि बेरशेबासह अनेक इस्रायली शहरांना लक्ष्य केले आहे, ज्यामध्ये 14 ते 15 लोकांचा मृत्यू आणि हजारो जखमी झालेत. तर तेल अवीवच्या आसपासच्या भागातही अनेक जणांचा मृत्यू झाला. IRGC ने इराकमध्ये अमेरिकन तेल टँकरवर समुद्री ड्रोन हल्ला केला.