जळगाव जिल्ह्यात सध्या हवामानाचा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे.दिवसा तीव्र उन्हाळा आणि कडक उष्णता तर रात्री गारठा.. अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दिवसाचे तापमान तब्बल 40.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून मध्य महाराष्ट्रात जळगाव सर्वाधिक उष्ण ठरले आहे. तर दुसरीकडे रात्रीचे तापमान 15.5 अंशांच्या खाली घसरल्याने राज्यात जळगाव सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण होत असताना, रात्री मात्र गार वाऱ्यामुळे थंडीचा अनुभव येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, दिवस आणि रात्री वाऱ्याचा वेग व दिशा बदलत असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.