महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडलं जाणार आहे.जबरदस्तीने आणि प्रलोभने दाखवून धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने हे विधेयक आणलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. अखेर आज हे विधेयक विधानसभेत मांडलं जाणार आहे.दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होणार आहे. राज्यात जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणल्याचं सरकारची भुमिका आहे.