Israel-Iran युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का, Iraq मधील अमेरिकेचं लष्करी विमान KC-135 कोसळलं

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर या युद्धात मृतकांचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. अशातच आता इराकमध्ये अमेरिकन सैन्याचे इंधन भरणारे विमान कोसळल्याची माहिती आहे. इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचे KC-135 इंधन भरणारे विमान कोसळल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितलय. घटनेनंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली. या घटनेत दोन विमानांचा सहभाग असून एक विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले, तर दुसरे सुरक्षितपणे उतरल्याची माहिती आहे. अमेरिकन सैन्याने सांगितले की, दोन विमाने यात सहभागी होती. एक विमान सुरक्षितपणे उतरले, तर दुसरे क्रॅश झाले. लष्कराने म्हटले की हा अपघात शत्रूच्या गोळीबारामुळे किंवा मैत्रीपूर्ण गोळीबारामुळे झाला नाही. सध्या बचाव मोहीम सुरू आहे आणि तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ