अभिनेत्री क्रिती सेनॉन गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात होती. त्यामागे कारण देखील तसं होतं. नुकताच क्रिती हिची एक जाहिरात प्रदर्शित झालेली. रक्षाबंधन निमित्ताने जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली. पण जाहिरातीत क्रितीने ज्या प्रकराचे कपडे घातले होते, त्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला. नेटकऱ्यांपासून, भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी देखील अभिनेत्रीच्या कपड्यावर निशाणा साधला. पण आता घेतलेल्या एका निर्यणामुळे क्रितीच्या कपड्यांवरचा वाद अखेर शमला आहे...क्रिती सेनॉन हिच्यावर चित्रीत वादात सापडलेली जाहिरात अखेर हटवण्यात आली आहे. जी जाहीरात रक्षाबंधन संधर्भात होती. जाहिरातीत अभिनेत्रीने घातलेल्या तोकड्या कपड्यांवरुन वाद सुरु झालेला. कंपनीने सांगितल्यानुसार, भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर आणि सन्मान आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही नेहमीच हे आनंदाचे क्षण संपूर्ण कुटुंबासोबत साजरे करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि या वेळी आम्हाला हे प्रेम आणि उत्सव आमच्या पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवायचं होतं.
Kriti Sanon's controversial advertisement withdrawn; controversy sparked by her wearing skimpy clothing in the ad.