Maharashtra Droughts | Sharad Pawar यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा | NDTV Marathi
Maharashtra Droughts | Sharad Pawar's drought inspection tour begins today | NDTV Marathi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पुरंदर दौंड आणि बारामती तालुक्यात दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौरा होणार आहे.सकाळी 10.30 पुरंदर तालुक्यातील परिंचे या गावात शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 11 वाजता वीर गावातील बांधावर पाहणी करतील. यानंतर सकाळी 11.30 वाजता लपतळवाडी येथील पाझर तलावाची पाहणी करतील. दुपारी १२ पासून पुढे वाल्हे, वाघधळवाडी, बाळाजीची वाडी, राख, गुळूंचे आणि निरा कॉर्नर येथे शेतकऱ्यांच्या भेटी घेतील. दुपारी 12 वाजता मांडकी गावांमध्ये शेतकरी मेळावाही होणार आहे.