Pune| आमच्याकडून संस्थेने Undertaking लिहून घेतलं होतं, तरी देखील दुर्दैवी दुर्घटना घडली- पालक

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या 8 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमी या खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती.यामध्ये 6 शिक्षक आणि 42 विद्यार्थ्यांचा समावेश होता.आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगार येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनर अकॅडमी चे आज 25 विद्यार्थी, 17 विद्यार्थिनी आणि सहा शिक्षक हे आज रायगड जिल्ह्यातील दिवेआगार या ठिकाणी सहलीसाठी गेले होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. सहलीला जाण्यापूर्वी विनर्स अकॅडमीने पालकाकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं होतं तरी देखील ही दुर्दैवी घटना घडली आहे. विनर्स अकॅडमीने अंडरटेकिंग लिहून सुद्धा योग्य खबरदारी न घेतल्याने ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि उर्वरित 34 विद्यार्थी हे सुरक्षित आहेत अशी माहिती विनर अकॅडमी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे

संबंधित व्हिडीओ