सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.उद्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात होणार असून केज जिल्हा व सत्र न्यायालयात उद्या पहिली सुनावणी होणार आहे.या सुनावणीदरम्यान प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.मोक्का अंतर्गत आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचे जबाब घेण्यात आलेत. उद्या हे जबाब बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत..तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे.