Manoj Jarange यांना झटका, आंदोलकांवर गंभीर गुन्हे मागे नाहीत; जरांगे पुन्हा आक्रमक | Special Report

मराठा आरक्षणासाठी राज्यात लाखोंचे मोर्चे निघाले... अतिशय शांततेत निघालेल्या या मोर्चाचं देशपातळीवर कौतुक झालं. पुढे मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी झालेल्या राड्यानंतर राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. शासकीय मालमत्तेचंही नुकसान झालं. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हेही दाखल झाले. ते गुन्हे मागे घेण्यासाठी मागणी जरांगेंनी केली होती. त्यानुसार आठशेच्या वर गुन्हे मागे घेण्यात आलेत. पण काही गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यावरुन जरांगे पुन्हा आक्रमक झालेत... पाहूया

संबंधित व्हिडीओ