आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर असताना, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामावरून मोठा वाद पाहायला मिळतोय. पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात दरवर्षी असणारा दोन दिवसांचा मुक्काम यंदा बदलणार, अशी चर्चा सुरू झाली… आणि त्यातूनच भाविक, वारकरी आणि मंदिर विश्वस्तांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. नेमका वाद काय आहे? प्रशासन आणि संस्थानची भूमिका काय आहे?