अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ताज पॅलेस इथं महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या चर्चेवर भर देण्यात आल्याची माहिती आहे. या दौऱ्यात विशेषतः भारत-अमेरिका व्यापार करारावर ही चर्चा केली जाऊ शकते. हा करार बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे आणि अंतिम स्वरुपाच्या जवळही पोहोचला आहे. मात्र अद्याप तो झालेला नसल्यानं रुबियोंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
मात्र या दौऱ्या दरम्यान रुबियो यांनी दिल्ली न गाठता मुंबई आणि जामनगरला प्राधान्य दिलंय.
याची काय कारणं आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून...