राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील आणि डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य दिलं जाणार आहे. प्रतिव्यक्ती तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू या प्रमाणात धान्याचं वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो लाभार्थी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.