राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबाबत निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना विरोधकांनी आधी त्यांच्या काळात काय काम केले, हे तपासावे, असा पलटवार केला