Pimpri Chinchwad पालिकेच्या इमारतीतच पाणी नाही, मनपाला खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीत आज सकाळपासून पाणी नाहीय. परिणामी महापालिकेला खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलीय. टँकरचा हा पाणी पुरवठा लपून-छपून करावा लागतोय ही शहराच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 100 टक्के भरलंय, तरी शहरात पाणी पुरवठा विस्कळीत असतोच, पालिकेत पाणी का नाही ? याचं उत्तर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाहीये, मात्र आज तीन खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलाय. अशी कबुली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलीये. या पाणीटंचाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी...

संबंधित व्हिडीओ