IMD Alert | वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता | NDTV मराठी

येत्या चार दिवसात देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढवून वेळेपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर तो हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये देखील पसरत असतो. यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

संबंधित व्हिडीओ