Mumbai Amravati Express Accident | मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला बोदवड रेल्वे स्थानकाजवळ अपघात जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात.बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅक वर आल्याने मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकली.बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ची घटना . रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती.पहाटे 4 वाजता पासून मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार.