मुंबईमध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज अचानक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी नारळी पौर्णिमा (8 ऑगस्ट) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (2 सप्टेंबर) या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.