Washim Adan River | पावसाळ्यात अडाण नदी कोरडी, पाऊस नसल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत | NDTV Marathi
Washim Adan River | Adan River dry during monsoon; farmers deeply worried due to lack of rain | NDTV Marathi
वाशीम जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश जलस्रोत कोरडे पडले आहेत. कारंजा तालुक्यातील अडाण नदीचे पात्रही पूर्णपणे कोरडे पडले असून नदीपात्रातील काही खोल भागातच अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी उपसा करत आहेत. मात्र पावसाअभावी आगामी काळात दुष्काळ आणि पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.