गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये काठे गल्ली परिसरात असलेल्या दर्गेवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.अशातच नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याला अनधिकृत ठरवत नोटीस बजावलीय. दर्गा अनाधिकृत असून 15 दिवसात हटवण्याची दर्ग्याच्या भिंतीवर नोटीस लावण्यात आलीय. तसेच अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास मनपानं कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या ट्रस्टींना दिलेला अल्टिमेटम बघता दर्ग्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. याचाच आढावा घेतलाय.