पुण्यातील ससून लाचखोरी प्रकरणात मोठं अपडेट समोर आलीय.जयंत चौधरींच्या घरातून 39 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.तर सुरेश बनवलेंच्या घरातून 1 कोटी 35 लाख जप्त करण्यात आलेत. काल 1 लाखांची लाच घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली. दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरी आज छापे टाकण्यात आले होते, त्यात ही मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आता दोन्ही आरोपींना 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.