अंजली दमानिया यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे जाऊन दमानिया यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दमानिया यांनी जरांगे यांच्या तब्बेतीची देखील विचारपूस केली.तसेच जरांगे यांच्या आतापर्यंतच्याआंदोलनाबाबत देखील चर्चा झाली.या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते.यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत देखील तिघांमध्ये चर्चा झाली.