Nandurbar| अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, हातात तोंडाशी आलेला उन्हाळी कांदा झोपला| NDTV मराठी

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात अवकाळीसह गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.या परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.कालच्या गारपिटीमुळे हातात तोंडाशी आलेला उन्हाळी कांदा अक्षरशः झोपला आहे.यासोबतच मका, मिरची यासह या गारपिटीचा तडाखा हा आंबा पिकाला देखील बसला आहे.त्या परिसरातील अनेक घरांची पडझड झाली असून या वादळी वाऱ्यात शेतकरी देखील जखमी झाले आहेत.2023 मध्ये देखील या परिसरात गारपीट झाली होती.. या नुकसानीचे तरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अर्थ मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ