खोक्या उर्फ सतीश भोसलेला वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. शिकारीचं साहित्य घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसलेला वन विभागाने ताब्यात घेतलं.त्याचबरोबर खोक्याने वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलं होतं.त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली.आता शिकार आणि हरणाचं मांसप्रकरणी वनविभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.तर दुसरीकडे खोक्याचे वकील ॲड. शशिकांत सावंत जामीन अर्ज दाखल केलाय.त्याच्या जामिनावर आता 5 एप्रिल रोजी बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे.