नाशिकमध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला होता.त्यानंतर काल दिवसभर नाशकात शोधमोहीम हाती घेण्यात आली.शहर परिसरातले सर्व सीसीटीव्हीही तपासण्यात आले. मात्र सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचा खुलासा नाशिक पोलिसांनी केलाय.नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला..मात्र तो आंधळे नसल्याचं समोर आलंय.तरीही पुन्हा एकदा त्या परिसरात शोध घेतला जाणार असल्याची माहिती नाशिकचे गुन्हे विभागाचे आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.