सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली आहे. सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि विरोधी पक्षाचे प्रमुख यांच्यातील या भेटीमागील कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, या अचानक भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.