चाकणमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे अचानक चाकणला भेट दिली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.