महाराष्ट्रामध्ये एक नवं वॉटर पार्क सुरू झालं तुम्हाला माहिती आहे का? पुण्यातल्या हिंजवडीमध्ये हे वॉटर पार्क सुरू झाले. म्हणजे गेले चार पाच दिवस तरी याच पाण्यातनं पुणेकर घरी जातायेत. हिंजवडीतल्या नद्यांचा, नाल्यांचा, रस्त्यांचा, इट पार्क चा आणि मुख्य म्हणजे पुणेकरांचा कुठलाही विचार न करता हिंजवडीमध्ये वाेल तशी बांधकामं करण्यात आली आहेत.