#uddhavthackeray #rahulgandhi #maharashtrapolitics दिल्लीमध्ये एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडीही पाहायला मिळत आहेत. सध्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी इंडिया आघाडीची बैठकही झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यावरुन आता महायुतीने ठाकरेंवर टीका केली आहे.