रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी 'रॅपिडो' कंपनीच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती. परंतु, आता त्याच 'रॅपिडो' कंपनीकडून सरनाईक यांच्या पुत्राने आयोजित केलेल्या 'प्रो-गोविंदा लीग' या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांची स्पॉन्सरशिप घेतली आहे. यावरून रोहित पवार यांनी "मंत्रीपदाचा गैरवापर करून 'मांडवली' करण्यात आली आहे" असे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी "मंत्र्यांनी आपली भूमिका 'रॅपिड' बदलली" असा टोमणाही मारला आ