गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं अशा गजरात सांगलीच्या खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा पार पडला.चंद्र पौर्णिमेच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडी येथे सिद्धनाथ यात्रा पार पडतेय.या यात्रेच्या निमित्ताने पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात.यामध्ये देवाच्या सासनकाठी भेटीचा सोहळा पार पडला.सासनकाठी सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह तेलंगणा राज्यातून लाखो भाविकांनी खरसुंडी नगरीमध्ये उपस्थिती लावली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळ्याचे पारने फेडणारा सासनकाठी भेटीचा सोहळा पार पडला आहे.