Satara| माथाडी कामगाराकडे आलिशान गाड्या, मुंबईत कोट्यवधींची जमीन; दत्ता पवारांच्या चौकशीचे आदेश

10-15 कोटींच्या आलिशान गाड्या, मुंबईत 200-300 कोटींची जमीन आणि साताऱ्यात टोलेजंग बंगला ही संपत्ती एका माथाडी कामगाराची आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या शेते गावचे माथाडी कामगार दत्तात्रय पवार यांची संपत्ती पाहून सगळेच अवाक् झालेत.दत्तात्रय पवार आणि वादग्रस्त अधिकारी दिनेश दाभाडे यांनी मिळून बहुराष्ट्रीय कंपन्यांना लुटल्याचा आरोप आहे.दत्ता पवारकडे 15-20 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत सोबतच मुंबईसारख्या शहरात 200-300 कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.या दत्तात्रय पवारांविरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात दोन पॅन कार्ड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.माथाडी कामगार असल्याचा फायदा उचलत माथाडी कायद्यातील पळवाटांचा वापर करत आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून मल्टिनॅशनल कंपन्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा आरोप करण्यात आलाय.राज्यातील अनेक उद्योजक या गुंडांच्या दादागिरीमुळे कंटाळल्याचा आरोप भाजप आमदार दटकेंनी केलाय.दरम्यान याप्रकरणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.

संबंधित व्हिडीओ