ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलिस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचं मोबाईल वर संभाषण झाल्याचं उघड झालं होतं. आणि काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समज बजावले होते. संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली. तर मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.