Actor Salman Khan ची सुरक्षा वाढवली, टायगरआधी Big B, Akshay, Aamir Khan च्या घराचीही रेकी ?

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सलमान खानच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीय... मुंबई पोलिसांसोबतच कमांडोंचं सुरक्षा कवच सलमानभोवती तैनात करण्यात आलंय... विशेष म्हणजे अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज जवानांचाही आता सलमानच्या सुरक्षेत समावेश करण्यात आलाय... सलमान एका कार्यक्रमासाठी पोहोचला, त्यावेळी त्याच्या कडेकोट सुरक्षेचा हा व्हिडीओ समोर आलाय..दरम्यान सलमान खानशी संबंधित असलेल्या कलाकारांच्या घराचीही रेकी झाल्याचं आता समोर आलंय..गोळीबार प्रकरणात अटकेतील तिन्ही आरोपींनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.टायगर श्रॉफआधी आरोपींनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आमीर खानच्या घराची रेकी केली होती.पण त्यांची सुरक्षा पाहून आरोपींनी आपला प्लॅन बदलला तिन्ही आरोपींनी पोलिसांकडे हा गौप्यस्फोट केला..रेकीच्या वेळी केलेले व्हिडिओ आरोपींनी अनिल पंडितला पाठवले होते..

संबंधित व्हिडीओ